पितृऋण उपक्रमांतर्गत दुवा तर्फे चार वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना शिधादान करणार करण्यात आले.सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे गरजू वृद्धांना अन्नदान करण्याचे मोठे काम पार पडले.
+91 87888 20338
duwakendra@gmail.com
पितृऋण उपक्रमांतर्गत दुवा तर्फे चार वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना शिधादान करणार करण्यात आले.सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे गरजू वृद्धांना अन्नदान करण्याचे मोठे काम पार पडले.
येरवडा भागात राहणारी वैशाली इंगवले ही अनाथ दिव्यांग मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. दिव्यांग असली तरी आपण नातेवाईकांवर भार होऊन जगणं नामंजूर, म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत होती. तिला 'दुवा'ने मदतीचा हात दिला. ' दुवा संकलन संवर्धन केंद्रा'तर्फे तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पिठाची गिरणी भेट देण्यात आली. ज्येष्ठ 'दुवा' सदस्य सौ. सुनंदाताई चव्हाण यांच्या हस्ते गिरणीची पूजा करून ती वैशालीच्या स्वाधीन करण्यात आली. आज ती आत्मनिर्भर होऊन काम करत आहे.
नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे घसरगुंडी आणि जंगल जिम भेट देण्यात आले.
१. तुमच्याकडे वापरत नसलेले पण वापरण्यायोग्य कपडे, भांडी, खेळणी, पुस्तकं ‘दुवा’ला देऊ शकता. त्या बदल्यात काही गरजू महिलांनी कापडाचा पुनर्वापर करून बनवलेल्या वस्तू विकत घ्याव्यात अशी निसर्गस्नेही अट आहे.
२. तुमच्या सोसायटी / वसाहतीमध्ये दर ३ महिन्यांनी कपडे, भांडी, खेळणी, पुस्तकांच्या संकलनासाठी आम्हाला बोलावू शकता.
३. ‘दुवा’च्या उपक्रमांत सक्रीय सहभाग.
४. ‘दुवा’च्या उपक्रमांसाठी आर्थिक मदत.
दिव्यांगांच्या सामूहिक विवाह प्रसंगी "दुवा" कडून
नववधूना "माहेरच्या साड्या" भेट देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये "दुवा" च्या माध्यमातून
पुस्तकरुपी अक्षरधन पोहोचलं आणि ग्रंथालयं समृध्द झाली!
वाड्या वस्त्यांवर काम करणाऱ्या अगदी उदयोन्मुख
संस्थांना देखील "दुवा" केंद्रात संकलित झालेल्या वस्तूंचा ठेवा मिळाला आहे.
सर्वांच्या साथीनं समाजविकास" या तत्त्वाचा अवलंब करून
इतर स्वयंसेवी संस्थांना त्यांचे उपक्रम राबविण्यासाठी "दुवा" कडून मदत!