दुवा संकलन, संवर्धन केंद्र

दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी ‘दुवा संकलन संवर्धन केंद्र’ या संस्थेची ‘संस्था नोंदणी कायदा १८६०’ (Societies registration act 1860) आणि ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५०’ (Maharashtra public trusts act, 1950) अंतर्गत अधिकृत नोंदणी झाली (P T R क्रमांक F56118/Pune). ७ समविचारी महिलांनी एकत्र येऊन आपल्या कौशल्य आणि क्षमतांचा उपयोग समाजासाठी व्हावा या उद्देशाने ‘दुवा संकलन संवर्धन केंद्र’ ही संस्था स्थापन केली.

image

'दुवा' चे आधारस्तंभ

image

अध्यक्ष

image

उपाध्यक्ष

image

कोषाध्यक्ष

image

सल्लागार

आकडे बोलतात

२६५०

संकलित कपड्यांचा पुनर्वापर करून बनवलेल्या वस्तू

४५,७८०

रेड डॉट बॅग्स

१६

शिवण, कागदी पिशव्या उद्योगातून आत्मनिर्भर झालेल्या महिला, मुली

२६

दुवा संकलन केंद्रातून वस्तू रुपात मदत मिळालेल्या संस्था

आमचे उपक्रम

पितृऋण उपक्रमांतर्गत दुवा तर्फे चार वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना शिधादान करणार करण्यात आले.सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे गरजू वृद्धांना अन्नदान करण्याचे मोठे काम पार पडले.







येरवडा भागात राहणारी वैशाली इंगवले ही अनाथ दिव्यांग मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. दिव्यांग असली तरी आपण नातेवाईकांवर भार होऊन जगणं नामंजूर, म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत होती. तिला 'दुवा'ने मदतीचा हात दिला. ' दुवा संकलन संवर्धन केंद्रा'तर्फे तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पिठाची गिरणी भेट देण्यात आली. ज्येष्ठ 'दुवा' सदस्य सौ. सुनंदाताई चव्हाण यांच्या हस्ते गिरणीची पूजा करून ती वैशालीच्या स्वाधीन करण्यात आली. आज ती आत्मनिर्भर होऊन काम करत आहे.

नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे घसरगुंडी आणि जंगल जिम भेट देण्यात आले.









तुम्ही असे सहभागी होऊ शकता

१. तुमच्याकडे वापरत नसलेले पण वापरण्यायोग्य कपडे, भांडी, खेळणी, पुस्तकं ‘दुवा’ला देऊ शकता. त्या बदल्यात काही गरजू महिलांनी कापडाचा पुनर्वापर करून बनवलेल्या वस्तू विकत घ्याव्यात अशी निसर्गस्नेही अट आहे.

२. तुमच्या सोसायटी / वसाहतीमध्ये दर ३ महिन्यांनी कपडे, भांडी, खेळणी, पुस्तकांच्या संकलनासाठी आम्हाला बोलावू शकता.

३. ‘दुवा’च्या उपक्रमांत सक्रीय सहभाग.

४. ‘दुवा’च्या उपक्रमांसाठी आर्थिक मदत.

सहभागी होण्यासाठी खालील तपशील भरा

आमची उद्दिष्टे

स्वस्थ समजाच्या केंद्रस्थानी असते ती सक्षम महिला. तिला आर्थिक दृष्ट्या सबल बनवून स्वतःची ओळख निर्माण करायला मदत करणे.  
अधिक माहिती

समृद्ध उद्यासाठी आजचे नवांकुर जोपासणे हेही तितकंच महत्वाचं! त्यासाठीच संस्थेचे दुसरे उद्दीष्ट आहे बालकल्याण. ज्या अंतर्गत लहान मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष दिलं जातं.  
अधिक माहिती

प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या खास कौशल्याला व्यावसायिकतेची जोड देणे. 
अधिक माहिती

सेंद्रिय पद्धतीने शेतीला प्रोत्साहन, नैसर्गिक आणि शाश्वत जीवनपद्धती बद्दल विशेषतः शहरी भागात जागृती करणे. 
अधिक माहिती

E- कचरा, वापरात नसलेले सामान, कपडे यांचा पुनर्वापर करणे 
अधिक माहिती

युवक, युवती आणि पौगंडावस्थेतील मुलं- मुली यांच्या समस्या सर्व सामाजिक स्तरात वेगवेगळ्या असतात. विशेषतः वस्ती विभागातल्या या वयातल्या मुलांची मार्गदर्शनाची गरज पूर्ण करणे.  
अधिक माहिती

चाकोरीबद्ध व्यवसायांच्या पुढे जाऊन " new normal" च्या गरजा लक्षात घेऊन व्यवसाय धंदा करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे 
अधिक माहिती

आरोग्य हा विषय कायमच महत्वाचा होता. पण कोविड सारख्या रोगांच्या लाटेनंतर आरोग्याचं महत्व अधोरेखित झालं आहे. विशेषतः वस्ती विभागातल्या नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करणे  
अधिक माहिती

प्रशंसापत्र

image
08
मार्च

दिव्यांगांच्या सामूहिक विवाह प्रसंगी "दुवा" कडून
नववधूना "माहेरच्या साड्या" भेट देण्यात आल्या.


image
13
फेब्रुवारी

ग्रामीण भागातील शाळांमध्ये "दुवा" च्या माध्यमातून
पुस्तकरुपी अक्षरधन पोहोचलं आणि ग्रंथालयं समृध्द झाली!

image
09
मार्च

वाड्या वस्त्यांवर काम करणाऱ्या अगदी उदयोन्मुख
संस्थांना देखील "दुवा" केंद्रात संकलित झालेल्या वस्तूंचा ठेवा मिळाला आहे.

image
08
मार्च

सर्वांच्या साथीनं समाजविकास" या तत्त्वाचा अवलंब करून
इतर स्वयंसेवी संस्थांना त्यांचे उपक्रम राबविण्यासाठी "दुवा" कडून मदत!